दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजनांच्या हक्कासाठी तयारीने उतरणार आहे . जिल्हयातील राष्ट्रीय पक्ष संलग्नित आघाडीशी युती अथवा स्वतंत्र पॅनेल असे दोन्ही पर्याय रिपाइंसमोर उपलब्ध आहेत. सहा नगरपंचायतीच्या 102 जागांपैकी किमान 50 जागा ताकतीने लढविणार असल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली .
रिपाइं ए गटाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय राजकीय हालचाली असणार या विषयावर जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला.
अशोक गायकवाड पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत याबाबतची घोषणा होऊन सहा दिवस झाले . याबाबत भाजप पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही . रिपाइं ला सर्व पर्याय उपलबध आहेत जो पक्ष आम्हाला न्याय देईल त्याबरोबर जाऊन निवडणूक लढवणार आहोत. येत्या आठ दिवसात पक्षीय आघाड्यांचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. शाहू फुले आंबेडकर यांची विचारसरणी दलितांच्या हक्कासाठी संघर्ष करणारी होती. या विचारधारेला प्राधान्य देणाऱ्या पक्षीय आघाड्याशी युती करण्याचे संकेत गायकवाड यांनी दिले. ते पुढे म्हणाले खंडाळा, लोणंद नगरपंचायतीत रिपाई पॅनल टाकण्याच्या विचारात आहे. शिरवळ येथे 6 तर वडूज येथे 4 अशा जागा लढवण्याची आमची तयारी आहे. कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नांना मतदारांनी आम्हाला बळ द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
येथील दलित आज असुरक्षित आहे. साहिल रणदिवे याने जयभीम म्हटल्याने त्याला मारहाण केली हे योग्य नाही. आम्हाला शांत राहू द्या आम्हांला लढण्यास भाग पाडू नये पोलिसांनी ही यामध्ये न्याय देण्याची भूमिका घ्यावी सातारा अशांत करू नये. गरिबाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका. जयभीम म्हणणे हा गुन्हा नाही. त्याचबरोबर दलितांवरील अत्याचार थांबवावे अन्यथा दलित पँथरला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल. भाजप, राष्ट्रवादी बरोबर युती झाली नाही तर प्रत्येक नगरपंचायतीच्या राजकीय अंदाज लक्षात घेऊन परिस्थिती सापेक्ष 10 ते 12 जागा लढवणार असल्याचे सूतोवाच गायकवाड यांनी केले. पर्यावरण समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे 15 डिसेंबरमध्ये हा दिन साजरा करणार आहोत. करोना महामारीमुळे दोन वर्षात महापरिनिर्वाण दिन करता आला नाही. यावर्षी ओमयक्रोन हा नवा म्युट्टंट आला तर आम्ही देशसेवा सुरक्षिततेसाठी पुढाकार घेऊ.