
दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | फलटण |
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महात्मा फुलेनगर कामगार वसाहत, फलटण येथे ३ जून रोजी प्रदेश उपाध्यक्ष श्री. अशोकराव मारुडा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीस माजी अध्यक्ष श्री. लाला सिद्धू डांगे, फलटण शहराध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, युवा प्रकोषठा जिल्हाध्यक्ष आनंद डांगे, प्रदेश संघटक विशाल मारुडा, सचिव नितीन वाळा, उपाध्यक्ष देवदास वाळा, सदस्य धनंजय वाळा, रमेश मारुडा, अनिल डांगे, करण सोलंकी, सूरज मारुडा, खजिनदार निखिल वाळा, बबलू डांगे, अमन वाघेला, प्रकाश मारुडा, रोहित मारुडा, सागर वाळा, राहुल डांगे, सारंग गलियल व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद महिला वर्ग उपस्थित होत्या. तसेच ६ जूनला रात्री १०.०० वाजता फलटणहून आझाद मैदान, मुंबई येथे जनआक्रोश मोर्चाला ३०० कर्मचारी कार्यकर्ते जाणार असल्याचे मनोज मारुडा, रमेश वाघेला यांनी सांगितले.

