स्थैर्य, मुंबई, दि. ३० : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात समाजातील सर्वस्तरातील लोकांकडून, संस्थांकडून शासनाला सहकार्याचे हात मिळत असून काल ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १८ लाख रुपयांचा धनादेश फेडरेशनच्या महाराष्ट्र युनिटचे मानद सचिव श्रीकांत पै यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनील प्रभू, फेडरेशनचे सहसचिव अशोक पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशन अर्थात एआयबीआरएफ ही संघटना बँकेतील सेवानिवृत्तांसाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे. २.५० लाखापेक्षा सदस्य असलेल्या या फेडरेशनने संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना सरकारच्या या अथक प्रयत्नांना बळ देण्याचे निश्चित केले आणि स्वच्छेने मदत जमा केली. जमा झालेल्या रकमेतून ६० टक्के रक्कम त्यांनी राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली तर उर्वरित ४० टक्के रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.
मुख्यमंत्र्याकडून आभार व्यक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनच्या सर्व सदस्यांना या मदतीसाठी मनापासून धन्यवाद दिले असून आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर राज्य शासन कोरोना विषाणूविरुद्ध लढत असल्याचे म्हटले आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि स्वंयशिस्तीमधून आपण या विषाणूला परतवून लावू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करावयाची आहे त्यांच्यासाठी माहिती खालीलप्रमाणे आहे.