राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे ३० हजार पात्र मानधन धारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

श्री.देशमुख यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२१ अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यात येत असून, यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झालेली आहे. राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबविण्यात येते. अलिकडेच या मानधनधारकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी रुपये 3150, ब श्रेणी रुपये 2700, क श्रेणी रुपये 2250) मानधन दरमहा अदा करण्यात येते.


Back to top button
Don`t copy text!