स्थैर्य, फलटण, दि. १५ : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोख्याण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध वाढविण्यात आलेले असल्याचे आदेश जारी केले आहेत. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेले आदेशच फलटण तालुक्यामध्ये लागू राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवाविरोध दर्शविल्यास संबंधितां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अनुसार तसेच भरतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
काय सुरु राहणार आहे?
- किराणा, भाजीपाला, दूध, बेकरी इ दुकाने पूर्णत: बंद राहतील परंतु सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान दुकानदारांना घरपोच सेवा देता येतील.
- हॅाटेल, रेस्टोरंट इत्यादी सेवा पूर्णत: बंद राहतील परंतु दुपारी १२ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येईल.
- कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधीत दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येईल.
- या सोडून इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील