
दैनिक स्थैर्य । दि. 19 जुन 2025 । फलटण । उद्या दि. २० जुन रोजी पावसाचे प्रमाण पाहता व वीर धरणामध्ये पावसाचे येवा पाहता वीर धरणातून सकाळी ६.०० वाजता २००० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. तरी निरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार डॉ. जाधव म्हणाले कि, सदर विसर्गाची टप्प्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.