अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर प्रवासाची चौकशी होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि. ०५ : अभिनेता अक्षय कुमार याचा नाशिकमधील खासगी दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री कारमधून फिरत असताना, अभिनेता अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली? असा सवाल करत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

“नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा?” असाही सवाल उपस्थित करत भुजबळांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.

अक्षय कुमार खासगी हेलिकॉप्टरने नाशिकला आला होता. नाशिकमधील सपकाळ नॉलेज हबच्या हेलिपॅडवर त्याचं आगमन झालं. या दौर्‍यादरम्यान तो परिसरातीलच एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामीदेखील थांबला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!