‘अक्षय कुमार योगींसाठी आंब्याची टोपली घेऊन आला असेल’ – संजय राऊत यांचा टोला


 

स्थैर्य, मुंबई, दि.२: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी तयार करण्यासाठीच्या चर्चेसाठी त्यांचा हा दौरा आहे. दरम्यान मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘ योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहे, साधु आहेत, योगी आहेत ते. मुंबईच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ते बसले आहेत त्यांच्यासोबत अक्षय कुमार देखील बसला असल्याचे मी पाहिले. कदाचित अक्षय कुमार आंब्याची टोपली घेऊन गेले असतील’ असे म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

…हा तर विनोद आहे


‘मुंबईतील फिल्म सिटी कोणी इकडून नेण्याची गोष्ट करत असेल तर तो विनोद आहे. हे काही सोपं नाही, याचा खूप मोठा इतिहास आहे. आम्हा सर्वांचे रस्त आणि घाम याच वाहिला आहे. योगी आदित्यनाथांना मी एढेच विचारू इच्छितो तुम्ही कोणताही मोठा प्रकल्प तयार करू इच्छित असाल तर करा. परंतु नोएडामध्ये जी फिल्म सिटी तयार केलेली त्याची आज काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी किती चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते? हे पण जरा मुंबईत येऊन त्यांनी सांगा’ असा सवाल राऊतांनी योगींना केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!