कॅचद्वारे नव्या मोहिमेसाठी अक्षय कुमार व भूमी पेडणेकरची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । डीएस ग्रुपचा भाग असलेल्या डीएस स्पाइसकोने कॅच सॉल्ट्स अॅण्ड स्पाइसेससाठी नवीन मोहिम लॉन्च केली आहे, ज्यामधून नवीन तत्त्व ‘क्यूंकी खाना सिर्फ खाना नही होता’ दिसून येते. डेण्टसू क्रिएटिव्हद्वारे संकल्पित ही मोहिम अन्नामध्ये आठवणी, बंध, परंपरा व मूल्ये अशा अनेक निर्मितींचा समावेश असतो या विचाराला सादर करते, ज्यामुळे ब्रॅण्ड ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाशी संलग्न असल्याची खात्री मिळते.

ब्रॅण्डने या संकल्पनेला सुरेखरित्या सादर करण्यासाठी आणि अन्न ही एक भाषा आहे, जी अनेक भावना व्यक्त करण्यासाठी वापरली जाते या विचारावर भर देण्यासाठी अक्षय कुमार व भूमी पेडणेकर यांची निवड केली आहे.

अक्षय कुमार म्हणाले, “आपण भारतीय अन्नाचा मनसोक्त आस्वाद घेतो. मला ब्रॅण्ड कॅच सॉल्ट्स अॅण्ड स्पाइसेस आणि त्यांच्या नवीन मोहिमेचा भाग हेाण्याचा आनंद होत आहे. माझ्यासाठी अन्न खूप महत्त्वाचे आहे. पडद्यावर ही भावना सादर करण्याचा आनंद होत आहे.’’

याप्रंसगी भूमी पेडणेकर म्हणाल्या, “कॅच सॉल्ट्स अॅण्ड स्पाइसेस उत्पादनांच्या व्यापक श्रेणीसह घराघरामध्ये लोकप्रिय बनले आहे. माझा विश्वास आहे की, स्वादिष्ट आहारामधून व्यक्तीचे मन जिंकता येते आणि हीच बाब ‘क्यूंकी खाना सिर्फ खाना नही होता’ या विचारामधून दिसून येते.’’

या मोहिमेबाबत सांगताना डीएस स्पाइसेस प्रा. लि. चे व्यवसाय प्रमुख श्री. संदीप घोष म्हणाले, “मसाले भारतीय पाककृतींचे आवश्यक घटक आहेत. ब्रॅण्ड म्हणून आमची आमच्या मसाल्यांच्या श्रेणीसह ग्राहकांच्या किचनमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे. नवीन मोहिम ग्राहकांच्या अन्नाप्रती विविध संवादांना सादर करेल. मला अक्षय व भूमी यांचे स्वागत करताना आनंद होत आहे, ज्यांनी त्यांच्या परफॉर्मन्ससह आमचे तत्त्व उंचावले आहे.’’

या मोहिमेमागील विचाराबाबत सांगताना डेण्टसू क्रिएटिव्हचे ग्रुप चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर अजय गेहलोत म्हणाले, “आपल्या शरीरासाठी अन्न हे इंधनासारखे आहे, अनेकदा आपण त्यामधून स्वत:ला अभिव्यक्त करतो आणि एकमेकांप्रती असलेली काळजी व्यक्त करतो. हे अन्नाचा आस्वाद घेताना होणारे बंध व संवादाबाबत आहे. या मोहिमेमागे हाच विचार आहे आणि मला अखेर हा विचार प्रत्यक्ष येताना पाहण्याचा आनंद होत आहे.’’


Back to top button
Don`t copy text!