
दैनिक स्थैर्य । 31 मार्च 2025। सातारा । अक्षय चव्हाण यांच्या घराला आग लागली होती. या आगीत सर्व कागदपत्रे जळाली होती. त्यांना रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र यासह सर्व अधिकर प्रशासनामार्फत मिळवून देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षय चव्हाण यांना शिधापत्रिका जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार नागेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, अक्षय चव्हाण यांच्या घराला आग लागल्यामुळे ते कामाच्या शोधात पाचगणी येथे गेले. अक्षय चव्हाण यांचे कुटुंबीय काम करीत असताना त्यांच्या लहान मुलाच्या सुरेक्षेसाठी त्याच्या पायाला दगडला बांधले होते.
हे दृष्य विविध माध्यमांवर प्रसारित झाले. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन या कुटुंबाला ठाणे येथे बोलवनू घेऊन मुलाची आरोग्य तपासणी करण्यात केली.
जिल्हा प्रशासनाने चव्हाण कुटुंबीयांची कागदपत्रे जळाली असल्याने त्यांना त्वरीत शिधापत्रिका देण्यात आली आहे.
मतदान कार्ड व आधार कार्ड देण्याची कार्यवाही करण्यात येवून त्यांना सर्व अधिकार मिळवून देण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.