दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानने मागील १३ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. आतापर्यंत महाराष्ट्र तील १७००० मुलांना शैक्षणिक मदत केली आहे. शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत समाजातील गुणवंत व गरजू मुलांसाठी एक हात मदतीचा म्हणुन शैक्षणिक वर्ष २१-२२ साठी महाराष्ट्राच्या विविध भागातील. . समाजातील तसेच तळागाळातील ६३० गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. भविष्यात देखील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा संस्थेचा मानस आहे. यावर्षी ज्या व्यक्तींनी, संस्थांनी संस्थेच्या कार्यास आपल्या परीने हातभार लावला अशा सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री .अमोल वंजारे यांनी व्यक्त केले आहेत.