फलटण आगारामार्फत श्रावणी शनिवारनिमित्त ‘अकरा मारूती दर्शन यात्रा’ सहल


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा विभाग अंतर्गत फलटण आगारामार्फत खास श्रावणी शनिवारनिमित्त भक्तांसाठी ‘अकरा मारूती दर्शन यात्रा’ आयोजित केली आहे. या सहलीचा तिकिट दर प्रति प्रवासी रू. ६००/- असून प्रवाशांनी या सहलीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रक प्रमोद साळुंखे यांनी केले आहे.

ही सहल दर श्रावणी शनिवारी पहाटे ५.०० वाजता फलटण बसस्थानकावरून निघेल व रात्री ११.०० वाजता फलटण येथे परत येईल.

या सहलीत तिकिट दरात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे.

बुकिंगसाठी वाहतूक नियंत्रक श्री. प्रमोद साळुंखे, मोबा. ९१५८७३५१५१ यांच्याशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!