दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था शाखा फलटणतर्फे दरवर्षीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकर्यांना मोफत दवाखाना उपचार केंद्रातर्फे औषधोपचार करण्यात आले. या दवाखान्याचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अवधूत गुळवणी, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. श्रीपाद चिटणीस, डॉ. विष्णूपंत त्रिपुटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या मोफत दवाखान्याला वारकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपचारासाठी मोठी रांग होती.
या उपचारासाठी मिलिंद नेवसे यांनी मोफत औषधे उपलब्ध करून दिली. ओंकार अपार्टमेंट येथील दवाखान्यात डॉ. जगदाळे, डॉ. अरुण अभंग, डॉ. युवराज नलावडे, डॉ. शिंगटे, डॉ. सुहास म्हात्रे यांनी वारकर्यांवर मोफत उपचार करून औषधे उपलब्ध करून दिली.
या शिबिरात शिवाजीराव घोरपडे, विलास दाणी, अनिरुद्ध इनामदार, नंदकुमार केसकर, निखिल केसकर, वरद आडकर, पुरुषोत्तम देवळे, सुभाष कुलकर्णी, दिलीप सहस्त्रबुद्धे, स्वानंद जोशी, आर. डी. इनामदार, वैभव विष्णूप्रद व इतर युवक कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष विजय ताथवडकर यांनी सर्वांचे आभार मानले.