दि.1 ते 9 जुलै दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ‘परिषद की पाठशाला’ उपक्रम; विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. 30 जून 2021 । फलटण । ’शिक्षार्थ विद्यार्थी सेवार्थ परिषद’ हे ब्रीद घेऊन काम करणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ‘परिषद की पाठशाला’ हा उपक्रम राबविण्यात येत असून सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दि.1 ते 9 जुलै दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन अभविप, सातारा कडून करण्यात आले आहे.

सातारा जिल्हा अभाविपकडून कोरोना महामारीमध्ये अनेक सेवाकार्ये करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्याची शैक्षणिक परिस्थिती पाहता अभाविप प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवत असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!