दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमंत बनेश्वर महादेव महाशिवरात्री उत्सव क्षेत्र घाडगेवाडी येथे शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी ते रविवार दिनांक १९ फेब्रुवारी अखेर संपन्न होणार आहे.
या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ५ ते ७ वाजेदरम्यान काकड आरती व महापूजा सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ६ ते ७ प्रवचन, ९ ते ११.३० कीर्तन सेवा, ११.३० ते रात्री २ वाजेपर्यंत जागर असे कार्यक्रम होणार आहेत.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह.भ.प. अनिल महाराज कुंभार (तडवळे), मृदुंगमणी ह.भ.प.पंढरीनाथ मुसळे आद्रकी बु॥, ह.भ.प. मोरेश्वर शिंदे (वाघोशी), गायनावृद ह.भ.प.कल्याण महाराज गीरी (सोमेश्वर), ह.भ.प. अनिल महाराज कोळेकर(नांदल), ह.भ.प.अनिल महाराज मोहिते (मुळीकवाडी), कीर्तन साथ बिबी मुळीकवाडी व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ घाडगेवाडी. या कार्यक्रमांना फलटण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य राहणार आहे.
रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. हरी महाराज गाडे यांचे प्रवचन तसेच ह.भ.प.आबा महाराज मोहिते (मुळीकवाडी) यांचे कीर्तन तसेच साखरवाडी भजनी मंडळ यांचा जागर. सोमवार, दि. १३ फेब्रुवारी ह.भ.प. चंद्रकांत महाराज मोहिते यांचे प्रवचन, ह.भ.प.नंदकुमार कुमठेकर महाराज (सासवड) यांचे कीर्तन व शेरेवाडी भजनी मंडळ यांचा जागर. मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी ह.भ.प. आबा महाराज मोहिते यांचे प्रवचन, ह.भ.प. दत्तात्रय महाराज गलांडे (इंदापूर) यांचे कीर्तन व हिंगणगाव भजन मंडळाचा जागर. बुधवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. विजय महाराज बोबडे यांचे प्रवचन, ह.भ.प.गणेश महाराज थोरवे (पुसेसावळी) यांचे कीर्तन व बिबी भजनी मंडळाचा जागर.
शुक्रवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. अनिल महाराज कुंभार यांचे प्रवचन, ह.भ.प. मच्छिंद्र महाराज भोसले (अहमदनगर) यांचे किर्तन, ह.भ.प सावता महाराज यांचे किर्तन व टाकुबाईची वाडी भजनी मंडळ यांचा जागर.
शनिवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. जगदीश पिल्ले (शिक्रापूर) यांचे प्रवचन, ह.भ.प.रामचंद्र महाराज दरेकर (अहमदनगर) यांचे कीर्तन व भादे भजनी मंडळ यांचा जागर.
शनिवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा जागर व सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत महाफराळाचे वाटप होईल. दुपारी ३ ते ६ दिंडी सोहळा निघेल.
रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प विश्वास आप्पा कोळेकर यांचे काल्याचे किर्तन होऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना श्री दशरथ शामराव बोबडे (आबा) यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.