
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
बालयोगी सदानंद महाराज तीर्थक्षेत्र परशुराम कुंड तुंगारेश्वर पर्वत यांच्या शुभ संकल्पनाने बालयोगी श्री सदानंद महाराज पारायण महोत्सव समिती व अखिल वारकरी भाविकांच्या विद्यमाने अखंड हरिनाम महोत्सव आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी (हिंदी) भव्य सामुदायिक पारायण सोहळा संत श्री नामदेव महाराज दरबार (गुरुद्वारा) घोमान, ता. बटाला, जि. गुरुदासपूर, पंजाब येथे गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी ते गुरुवार, दि. २ मार्च अखेर संपन्न होणार आहे.
या सप्ताह सोहळ्यात दररोज पहाटे काकडानंतर पारायण, भक्ती संगीत, दुपारी श्री ज्ञानेश्वरी भावकथा या विषयावर दररोज दुपारी प्रवचन, हरिपाठ, कीर्तन माऊली विठूनामयाका, हिंदी नाटके सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ अयोध्या येथील रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज, संत नामदेव महाराज, दरबार कमिटीचे अध्यक्ष बाबा तारसेनसिंह तसेच देवगड संस्थान अहमदनगरचे भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास फलटण तालुक्यातून असंख्य भाविक या पारायण सोहळ्यात सामील होण्यासाठी रवाना झाले आहेत.