
दैनिक स्थैर्य | दि. 02 एप्रिल 2025 | मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आमदार सचिन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. केक कापून वाढदिवस साजरा करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सचिन पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे, ही शुभेच्छा दिली. त्याचबरोबर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रीजीत नाईक, आमदार सना मलिक, माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन सुधाकर पाटील यांना “शांत, संयमी पण तडफदार नेतृत्व” म्हणून ओळखले जाते. ते लोकनेते स्व. हिंदुराव यांच्या मुशीत घडलेले हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली जाणार आहेत.