
दैनिक स्थैर्य । 19 जुलै 2025 । फलटण । उप मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2025 ते 22 ऑक्टोबर 2025 दरम्यान ग्रामीण पुणे जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हिंच्यावतीने वृक्ष योग आरोग्य महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यावेळी 66000 विद्यार्थ्यांतर्फे लक्ष्मीतरू रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगचे वृक्ष लागवड व संगोपन समन्वयक प्रभाकर जगताप यांच्या संकल्पनेतून व महानंद डेअरीचे माजी व्हाईस चेअरमन डी. के. पवार यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साखरवाडी व पिंपळवाडी व माध्यमिक विद्यालयातील 2166 विद्यार्थ्यांना लक्ष्मीतरू रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
आरोग्य, योग, पर्यावरण या उपक्रमांतर्गत ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष अभियान’राबविण्यात येणार आहे. शालेय मुलांचे आरोग्य व योग शिबिर कॅन्सर तपासणी शिबिर, पर्यावरण संवर्धन जनजागृती हे उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळा, हायस्कूल, ग्रामपंचायत यांच्या सहभागाने ग्रामीण भागांमध्ये राबवले जाणार आहेत. याचे नियोजन आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक व शाश्वत विकास फाउंडेशन मार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी 775731919, 7387739488, 8793747262 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.