
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. त्यांचा विवाह फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असून शरद पवारांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली आहे. जय आणि ऋतुजा यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सहकारमहर्षी स्व. हणुमंतराव पवार (अण्णा) यांची नात ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव जय अजितदादा पवार यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे.
जय पवार यांनी भावी पत्नीसह शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पवार कुटुंबियांनी नवीन जोड्याचं औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. त्याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा सोहळा राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आकर्षित करणार आहे.
अजित पवार हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या या महत्त्वाच्या क्षणाला राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या लग्नाच्या सोहळ्यातून राजकीय संबंधांची नवीन पातळी निर्माण होण्याची शक्यता आहे.