दैनिक स्थैर्य | दि. 30 डिसेंबर 2024 | फलटण | फलटण तालुक्यातील अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडीच्या वतीने हजारो महिलांची फसवणूक झाल्याच्या आरोपांमुळे या शाखेविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात महिलांनी तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. या तक्रारी अर्जांचे नेतृत्व फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी केले होते.
अनुप शहा यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी अनेक महिला उपस्थित होत्या. या सर्व महिलांचे तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनने स्वीकारले असून, योग्य ती चौकशी करून कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल होईल असा विश्वास अनुप शहा यांनी व्यक्त केला आहे. अजित मल्टीस्टेट शाखेच्या कार्याविषयी अनेक दिवसांपासून अनुप शहा आवाज उठवत होते, ज्यामुळे या महिलांना न्याय मिळवून देण्याचा लढा यशस्वी करण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी करण्यात येईल असा विश्वास अनुप शहा यांनी आलेल्या महिलांना दिला. या नेत्यांच्या पाठिंबाने महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे व त्या न्यायासाठी अधिक एकजुटीने लढत आहेत.
पोलीस स्टेशनने दाखल झालेल्या तक्रारी अर्जांवर योग्य ती चौकशी करून कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची तपासणी पूर्ण होताच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.