दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । सातारा । सेवानिवृत्तीनंतर अथवा वयाने ज्येष्ठ झाल्यावर यापुढे आपल्याला कसं जगायचं आहे यासाठीच आर्थिक नियोजन कसं करावं यासंदर्भात अगदी नेमकेपणाने मांडणी करणारे आणि गेली वीस वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेले सातारा येथील आर्थिक नियोजक अजित करडे यांचे सेवानिवृत्तीनंतर च आर्थिक नियोजन कसं करावं या विषयावर बुधवार दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी चार वाजता ज्येष्ठ नागरिक संघ , श्री. छ. प्रतापसिंह महाराज ( थोरले ) उद्यान , राजवाडा सातारा येथे व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघ सातारचे कार्याध्यक्ष सुजित शेख व कार्यवाह विजय मांडके यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या इच्छेनुसार त्यांची मालमत्ता वितरित व्हावी , मृत्युपत्र , इच्छापत्र या अनुषंगाने चर्चा व्हावी यासाठी हे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव असणार आहेत. मृत्युपत्र व इच्छापत्र या अनुषंगाने कायदेशीर सल्ला , मार्गदर्शन तसेच प्रश्नोत्तरेही यावेळी होतील अशी माहिती खजिनदार मदन देवी यांनी दिली. या कार्यक्रमाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी व सेवानिवृत्तांनी घ्यावा असे आवाहन जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.