दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । बारामती । बारामती औद्योगिक वसाहतीतील पेन्शन चौकात एक बेवारस मनोरुग्ण अंदाजे ६५ वयातील आजी बेवारस स्थितीत गेल्या तीन-चार महिन्यांपासून ऊन वारा पाऊस असा कोणताही आधार नसताना देवा स्थितीत गोखळी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे पाटील यांना आढळून आल्या. आजी इतक्या मनोरुग्न होत्या की त्यांना आपला पत्ता नाव गावही सांगता येत नव्हते.
आजींना एका हाताचा पंजा नाही अशा बेवारस अपंग आजीज निवारा मिळावा या भावनेतून पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई डिंबळे या आसरा अनाथांचा हक्काचा निवारा कात्रज पुणे संस्थेच्या व्यवस्थापक स्वातीताई डिंबळे यांच्याशी फोनवरून संपर्क करून सदर बेवारस आजींची माहिती दिली असता त्यांनी त्यास तत्काळ प्रतिसाद देऊन आजींना या संस्थेत दाखल करण्याचा शब्द दिला.
त्वरित बारामती पोलीस उपनिरीक्षक लंगोटे साहेब गायकवाड साहेब आणि साळुंखे साहेब यांच्या आणि आमचे सहकारी रमेश दादा गावडे व दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने सदर बेवारस मनोरुग्णोरुग्ण आजीस “आसरा अनाथांचा हक्काचा निवारा, कात्रज, पुणे” या संस्थेच्या स्वाधीन करण्यात यश आले.