अजिंक्यतारा सूत गिरणी कामगारांना भरघोस पगारवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ जानेवारी २०२२ । सातारा । वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीतील कामगारांना जानेवारी २०२२ पासून भरघोस पगारवाढ करण्यांत आली असून यामुळे गिरण कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोव्हीड-१९ मुळे व्यवसायात आलेली मंदी तसेच बेकारीचे वाढते प्रमाण या सर्व गोष्टींचा विचार करता, तसेच वाढलेली महागाई यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचे कंबरडे मोडले आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये भरमसाठ वाढलेले कापसाचे दर व त्या प्रमाणात सूतास योग्य दर मिळत नसलेने सूत गिरणी व्यवसायाला अडचणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण परिस्थीतही अजिंक्यतारा सह. सूत गिरणीने अडचणींवर मार्ग काढत सूत निर्यात करण्याचा धाडसी निर्णय घेतला व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजिंक्यस्पिन सूतास नावलौकिक मिळवून दिला असून सूतनिर्यातीमुळे आर्थिक अडचणींवर मात करत संकटकाळी गिरणीची आर्थिक परिस्थीती मजबूत ठेवता आली. ही बाब गौरवास्पद असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी सांगितले. सतत वाढणार्‍या महागाईचा विचार करता संस्थेच्या कर्मचारी वर्गालाही आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व्यवस्थापनाने कामगारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना माहे जानेवारी २०२२ पासून वेतनवाढ देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदरप्रसंगी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले उपस्थित होत्या. तसेच गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, व्हा. चेअरमन बापूराव महाडीक, संचालक गणपतराव मोहिते, अजित साळुंखे, बळिराम देशमुख, जगन्नाथ किर्दत, भरत मतकर, भरत कदम, सचिन गायकवाड, सुरेश टिळेकर, रघुनाथ जाधव, आबासो साबळे, अशोक काठाळे, अशोक कदम, उल्हास भोसले, सुनिल देशमुख, भगवान शेडगे, संचालिका सौ. रत्नमाला डांगे, सौ. साधना ङ्गडतरे यांच्यासह गिरणीचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, चीङ्ग अकौंटंट श्री. मानसिंग पवार, प्रॉडक्शन मॅनेजर रमेश निळकंठ, मिल इंजिनीयर प्रदीप राणे, एच.आर. मॅनेजर राजेश दिक्षीत व सर्व कर्मचारी व महिला कामगार उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!