दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । सूत गिरणीमध्ये आधुनिक व तांत्रिक दृष्ट्या मॉडर्न अशा सर्व प्रकारच्या मशिनरी बसविल्यामुळे तसेच वेळोवळी उत्पादनासाठी सुयोग्य कच्चा माल कापूस, यंत्रसामग्रीची देखभाल दुरूस्ती, उत्पादनाची विविध स्तरावर चांचणी यामुळे अजिंक्यस्पिन सूतास चांगला दर्जा राखता आला आहे. जागतीक मंदी आणि लॉकडाऊनच्या कठिण कालावधीतही अजिंक्यतारा सूत गिरणीने प्रगतीचा आलेख उंचावून एक आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
वळसे ता. सातारा येथील अजिंक्तारा सहकारी सूत गिरणीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गिरणी र्कास्थळावर कोरोना प्रतिबंधासाठी शासनाचे सर्व नियमाचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने उत्साहात संपन्न झाली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. सभेच्या अध्क्षस्थानी चेअरमन उत्तमराव नावडकर होते. यावेळी गिरणीचे व्हा.चेअरमन बापूराव महाडिक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक अनंता वाघमारे, नितीन पाटील, माजी व्हा. चेअरमन दिलीप निंबाळकर, अजिंक्यतारा सह.कृषी औद्योगिक ऊस तोडणी व वाहतूक संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण फडतरे, सूत गिरणीचे संचालक जगन्नाथ किर्दत, बळिराम देशमुख, आबासो साबळे, अशोक कदम, अशोक काठाळे, सुनिल देशमुख, भगवान शेडगे, रघुनाथ जाधव, सचिन गायकवाड, सुरेश टिळेकर, गणपतराव मोहिते, माजी चेअरमन विष्णू सावंत, माजी संचालक भानुदास मोहिते, अजिंक्तारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, गिरणीचे सभासद उपस्थित होते.
अजिंक्यतारा सूत गिरणीच्या सूतास स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी वाढली आहे. आपल्या संस्थेने चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याचे धोरण आखलेने परकिय चलन आपल्या देशाला मिळणार आहे. गिरणीने अल्पावधीतच निर्यातक्षम सूताची निर्मीती करून व सूताचा चांगला दर्जा ठेवल्यामुळे परदेशातही अजिंक्यस्पिन सूतास मागणी वाढली आहे, ही बाब अत्यंत भूषणावह व समाधानाकारक आहे. सूत गिरणामध्ये अत्याधुनिक मशिनरी बसविण्याचा निर्णय घेण्यांत आल्यामुळे उच्च प्रतीचे सुटिंग व फर्निशींग फायब्रिक सूत तसेच कार्डेड कॉम्प्यक्ट, कोंम्बड व स्लब आदी सूताची निर्मीती केली जात आहे.
उत्कृष्ट मार्केटिंग तंत्र याबरोबरच व्यावसाईक व्यवस्थापन व खर्चात काटकसर आदी बाबींवर गिरणीचे आधिकारी व कर्मचारी तसेच संचालक मंडळाने विशेष भर दिल्यानेच ही प्रगती साध्य करता आली. पुढील कालावधीमध्ये सूत गिरणी सक्षम करण्याचे तसेच २५२०० चात्यांचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणेसाठी संचालक मंडळाचे कसोशीचे प्रयत्न आहेत. याकरीता आपणा सर्वांची आत्तापर्यंत मिळालेली मोलाची साथ यापुढेही अशीच लाभावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सभासदांना केले.
सभेच्या प्रारंभी स्व. श्रीमंत छ.अभसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चेअरमन उत्तमराव नावडकर यांनी स्वागत केले. गिरणीचे र्काकारी संचालक श्री. संजय कुलकर्णी यांनी श्रध्दांजली ठराव वाचन केले आणि चीफ अकौंटंट मानसिंग पवार यांनी नोटीस व विषय वाचन केले. सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. संचालक अजित साळुंखे यांनी आभार मानले. यावेळी प्रॉडक्शन मॅनेजर रमेश निळकंठ, मिल इंजिनीर प्रदीप राणे, एच आर मॅनेजर राजेश दिक्षीत, कर्मचारी व महिला उपस्थित होते.