अजिंक्यतारा कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक


स्थैर्य, 21 फेब्रुवारी, सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सन 2025-26 चा गळीत हंगाम सुरू असून उपविभागीय अधिकारी, सातारा यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पवकाने दि. 18.02.2026 रोजी सकाळी 10.00 वाजता कारखान्यास अचानकपणे भेट देऊन कारखान्यातील चाळीस टनी 1, साठ टनी 2 तसेच 80 टनी 1 ऊस वजन काट्यांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान हे सर्व ऊस वजन काटे ततोतंत व अचूक वजन दर्शवित असल्याचे स्पष्ट झाले व तसा अहवाल भरारी पथकाने दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी दिली. यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी विलास पाटील, केनयार्ड सुपरवायझर प्रमोद कुमार व सर्व अधिकारी उपस्थित होते.

शासकीय भरारी पथकाने सर्वप्रथम ट्रॅक्टर- ट्रॉली क्र.MH-23-C-0587, MH-16-BG-0082, MH-23-T-2061, MH-11-CW-734, MII-11-CG-9586 इत्यादी ऊसाने भरलेल्या वाहनांचे फेरवजन करून ते बरोबर असल्याची खात्री करून घेतली. तसेच वाहनामधील ऊसाचे बजन इलेक्ट्रॉनिक वे-ब्रीज इंडिकेटरला तंतोतंत असल्याचे दिसून आले व संपूर्ण ऊस वजन काटे अचूक वजन दाखवत असल्याचे सर्वांच्या समक्ष आढळून आले. यानंतर शासकीय भरारी पथकाने ऊस वजन काटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले. सौ. अनिता अटक लेखा परिक्षक, श्रेणी-1, व धनश्री तेलंगे निरीक्षक वैधमापन शास्त्र सातारा-1 यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकामध्ये निलेश तांबे पोलिस निरीक्षक, सातारा ग्रामीण सातारा, पुरवठा अधिकारी अतुल जिवणे आदींचा समावेश होता.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करीत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्याची तपासणी ही शासनाचे वैध मापनशास्त्र, सातारा यांच्यामार्फत दरवर्षी नियमितपणे करून घेतली जाते. त्यामुळे ऊस वजन काटे तंतोतंत वजन दर्शवित असल्याने ऊस वजनाच्या बाबतीत ऊस उत्पादक सभासद, बिगर ऊस उत्पादक सभासद, शेतकर्‍यांचा कारखान्यावर पूर्णपणे विश्वास असून अजिंक्यतारा कारखान्याने शेतकर्‍यांचा विश्वास सार्थ ठरवला असल्याचे कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे व व्हाईस चेअरमन नामदेव सावंत यानी यानिमित्ताने सांगितले.


Back to top button
Don`t copy text!