स्थैर्य, सातारा, दि.२०: आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणीत कारखाना म्हणून नवलौकिक मिळवलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आणि बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ बुधवार दि. २१ रोजी सकाळी १०.३० वाजता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शाहूनगर, शेंद्रे ता.जि. सातारा येथे कारखाना कार्यस्थळावर होणार्या या समारंभास कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, मजूर, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपस्थितांनी सामाजिक अंतराचे पालन करावे आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वास शेडगे आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले आहे.