
दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
माजी आमदार बाबुराव माने यांचे विश्वासू सहकारी अजय वाघ यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनांतर्गत मुंबई उत्तरच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी जारी केला आहे.
शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी आदेशात म्हटले आहे की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिक्षक सेनेच्या संघटनात्मक कार्याला गती देण्याच्या द़ृष्टीने अजय वाघ यांची शिक्षक सेनांतर्गत मुंबई उत्तर विभागाकरीता सचिवपदी नियुक्ती करत आहे.
या निवडीबद्दल अजय वाघ यांचे शिक्षक सेनेचे पदाधिकारी व फलटण तालुक्यातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.