स्थैर्य, फलटण : फलटण नगरपरिषदेचे विद्दमान नगरसेवक आणि दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी अजय माळवे यांना फलटण तालुका ग्रामिण पञकार संघाच्या वतीने “कोव्हीड योद्धा” पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पादूर्भावाच्या कालावधी मध्ये वॉर्डात अन्नछञ, किराणा माल, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन स्वतः केलेल्या जंतूनाशक फवारणी व समुपदेशन करून कोरोना बाबतची जनजागृती त्यांनी केलेली होती. याच कार्याची दाखल घेत फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.
यावेळी पुणे विभागिय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, तालुकाध्यक्ष दिपक मदने, उपाध्यक्ष सुभाष सोनवलकर, सचिव रोहन झांजुर्णे, अशोकराव सस्ते, चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोव्हीड योद्धा पुरस्कार मिळण्याची अजय माळवे यांची हॅट्रिक झाली असून महाराष्ट्रातील प्रख्यात के. बी. एक्सपोर्ट्स या कंपनींच्या वतीने कोव्हीड योद्धा म्हणून गौरविण्यात आलेले होते. तसेच सत्यमेव जयते ट्रस्ट इंङिया यांच्या वतीने सुद्धा कोव्हीड योद्धा हा पुरस्कार देऊन माळवे यांना गौरविण्यात आलेले होते.