अजय देवगणचा भाऊ अनिल देवगणचे निधन


 

स्थैर्य, दि.६: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते 51 वर्षांचे होते. अजयने मंगळवारी दुपारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. कोरोनाच्या सद्य परिस्थितीमुळे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे अजयने सांगितले.

अनिल देवगण यांच्या निधनाची माहिती देताना अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगणला कायमचे गमावले. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजय देवगण फिल्म्स आणि मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. कोरोनामुळे प्रार्थना सभा घेण्यात येणार नाहीये,’ असे अजयने ट्विटमध्ये सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!