दुबईमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना १५ दिवसांसाठी बंदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दुबई, दि.१९: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणा-या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कंपनीनं दोन वेळा नियमांचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान, दुबईला एअर इंडियाच्या विमानातून गेलेल्या कोरोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाईन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे. दुबईसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसला पुन्हा विमानं सुरू करण्यासाठी, असे प्रकार पुन्हा थांबवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठीही सांगण्यात आलं आहे. ४ सप्टेंबर रोजी जयपूरवरून दुबईला जाणा-या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशानं प्रवास केला होता. तसंच त्याला त्यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यानंतरही कंपनीनं त्याला प्रवास करण्यास दिल्याचं सांगण्यात येत आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणा-या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कंपनीनं दोन वेळा नियमांचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान, दुबईला एअर इंडियाच्या विमानातून गेलेल्या कोरोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाईन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे. दुबईसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसला पुन्हा विमानं सुरू करण्यासाठी, असे प्रकार पुन्हा थांबवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठीही सांगण्यात आलं आहे. ४ सप्टेंबर रोजी जयपूरवरून दुबईला जाणार्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशानं प्रवास केला होता. तसंच त्याला त्यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यानंतरही कंपनीनं त्याला प्रवास करण्यास दिल्याचं सांगण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!