दैनिक स्थैर्य । दि.२५ मार्च २०२२ । मुंबई । वीज क्षेत्रात गुंतवणूक होण्याच्या दृष्टीने कृषी फिडर विलगीकरण, सौर कृषी पंप उपलब्धता, उच्च दाब वितरण प्रणाली योजना, उपकेंद्र निर्मिती, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 इत्यादी पायाभूत सुविधा राबविण्यात येत आहेत. हे सर्व करत असताना ग्रीन सेस मधून शेतकऱ्यांना 1 लाख कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट असून याकरिता निधीची कमतरता भासणार नसल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता.