शिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा समावेश प्रभावीपणे व्हावा : माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 20 डिसेंबर 2024 | फलटण | ‘‘शालेय शिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा समावेश प्रभावीपणे व्हावा व विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे’’, असे मत फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत अनिकेतराजे बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भिमराव माने, सौ.सरस्वती माने,कोषाध्यक्षा सौ.सविता माने, ग्रामविकास अधिकारी विकास गायकवाड, व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, मनोज पवार, ऋषीकेश गायकवाड, प्रथमेश गायकवाड यांच्यासह कोळकी च्या माजी सरपंच सौ.रेश्मा देशमुख व सौ.स्वप्ना कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात डान्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना व नवदुर्गांच्या आराधनेने झाली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनींनी राजस्थानी चिरमी हा नृत्यप्रकार सुंदरपणे सादर केला तर पर्यावरण संवर्धनाचा बहुमोल संदेश नृत्याच्या माध्यमातून दिला, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनींनी लोकप्रिय संबळपुरी हा ओडिसी लोकनृत्यप्रकार, त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शुरवीर बाजीप्रभू यांचा पराक्रम सांगणा-या ‘शिवबा आमचा मल्हारी’ गाण्यावर नृत्य केले. इ.11 वीच्या विद्यार्थ्यांनींनी ‘बॉलीवूड फ्युजन’ चे सादरीकरण केले. इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी उद्योपती रतन टाटा यांच्यावर आधारित नाटिका सादरीकरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘साउथ इंडियन फ्युजन’ व विद्यार्थ्यीनींनी ‘महाभारत कथा संग्राम की’ या गाण्यावर नेत्रदिपक नृत्य सादर करत उपस्थित पालकांचे व पाहुण्यांची मने जिंकली.

नंतर विद्यार्थ्यांनी ‘देश रंगिला’ या गाण्यावर रिदमिक योगा, इ.सहावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध राज्यांच्या नृत्यप्रकार व संस्कृतीचे दर्शन घडविणारी ‘इंडियन कल्चर’ ही थीम उत्कृष्टपणे सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध रोबोज् च्या मॉडेल्सचे कोंडींगच्या साहाय्याने सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी राजा आणि देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांना ‘जय जवान, जय किसान’ थीमद्वारे मानवंदना देण्यात आली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य अमित सस्ते यांनी प्रोग्रेसिव्हच्या यशस्वी वाटचालीचा थोडक्यात आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम यांचा आढावा घेतला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमामधून भारत देशाच्या विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणा-या ‘अतुल्य भारत’ ही वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम असल्याचे सांगितले.

पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्रोग्रेसिव्हच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार अभिजित सोनवणे, विशेष अतिथी म्हणून मुधोजी कॉलेजचे प्राचार्य पंढरीनाथ कदम, सौ. राजश्री शिंदे , संस्थेचे संस्थापक व इतर सर्व पदाधिकारी, कोळकीच्या माजी सरपंच, लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या महिला पदाधिकारी इ.मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथींसह सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले.त्यानंतर प्राचार्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचा हेतू व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि नंतर बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाला इ.1ली ते 3री च्या विद्यार्थ्यांनी गाण्याद्वारे नमन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.
. पुर्व प्राथमिकमधील नर्सरी विद्यार्थ्यांनी ओल्ड मॅकडोनल्ड, यु.के.जी च्या बाल चिमुकल्यांनी चंदा चमके चम चम अँड ख्रिसमस/वेलकम साँग,एल.के.जी च्या विद्यार्थ्यांनी जादु गाण्यावरं उत्कृष्ट नृत्य सादर केले व पालकांनी ही टाळ्या वाजवून कौतुक केले. तसेच इयत्ता तिसरी विद्यार्थ्यांनी कोळीगीते, तसेच वीर तानाजी मालुसरे यांचे नाटिकेचे उत्तम सादरीकरण केले. इ.4 थी च्या विद्यार्थ्यांनी मराठी अजरामर चित्रपटांतील गाण्यांची मैफिल आणि इस्रो च्या आव्हानात्मक चांद्रयानच्या तीनही मोहिमांचा प्रवास सादर केला.
इयत्ता चौथीच्याच विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील आजी – आजोबांची नातवंडांना भेटण्याची व्याकुळता दर्शवणारा हृदयस्पर्शी प्रसंग सादर केला व उपस्थितांचे डोळे पाणावले. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी यादो की बारात या गीताच्या माध्यमातून जुन्या मैदानी आनंददायी खेळप्रकार दाखवण्यात आले व साउथ इंडियन या गीतावरती नृत्य सादर करून मने जिंकली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वेलकम मॅशअप आणि बॉलीवूड फ्युजनचे उत्तम सादरीकरण केले.तसेच विविध योगासनांचे प्रात्यक्षिके सादर झाली.

तत्पूर्वी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून पालकांनी मुलांना जास्त वेळ द्यावा असे मत मांडले. प्रशालेच्या यशस्वी वाटचालीबद्ल अभिनंदन केले. प्राचार्य पंढरीनाथ कदम यांनीही सांस्कृतिक मुल्ये रुजविण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले व शुभेच्छा दिल्या.

वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी पणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सुजाता गायकवाड, माधुरी माने,अहिल्या कवितके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.नृत्य दिग्दर्शक – प्रशांत भोसले व पौर्णिमा अंबरगे
वरील सर्व विद्यार्थ्यांचे नृत्य अतिशय छान पद्धतीने दिग्दर्शन केले होते.

या कार्यक्रमास सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उस्फूर्त प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ही करण्यात आले होते. विशेषतः मुलांनी केलेले सुत्रसंचालन उपस्थितांना प्रचंड भावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे रोहीनी जाधव, सुप्रिया बनसोडे व ज्ञानेश्‍वर जाधव, ताहीर मेटकरी यांनी मिळून केले. तसेच आभार शितल कदम आणि जागृती गुप्ता यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!