
दैनिक स्थैर्य । 1 जून 2025। बारामती । हिंदू संस्कृती रक्षक, उत्तम प्रशासक,जनतेच्या कैवारी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सावळ ग्रामपंचायत च्या सरपंच तृप्ती आटोळे यांनी केले. सावळ (ता. बारामती) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी त्रिशताब्दी जयंती चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच तृप्ती आटोळे, उपसरपंच चेतन आटोळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आटोळे, नितीन भिसे, फक्कड बालगुडे, माजी सरपंच विठ्ठल आटोळे, मंगलदीप पतसंस्थेचे चेअरमन जितेंद्र विरकर, दत्तात्रय पवार, मारुती आटोळे, दत्तात्रय आवाळे, गणेश विरकर, आप्पा काशिद, सचिन आटोळे, गोरख साबळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. जितेंद्र वीरकर यांनी आभार मानले.

