‘माण तालुक्यात “अहिल्या पॅटर्न “चा बोलबाला’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती करण्यात अहिल्या शिक्षण संस्थेची भूमिका ठरली निर्णयाक

स्थैर्य, म्हसवड दि. ३० : महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या माण तालुक्यात सहा शाखा कार्यरत असून सहा पैकी पाच शाखांचे  निकाल शंभर टक्के लागले असून सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा गुणवत्तापूर्ण मार्क मिळाल्याने माणसह सातारा जिल्ह्यात “अहिल्या पॅटर्न” चा बोलबाला सुरू आहे. 

विरळी ता.माण येथील  श्री जानुबाई विद्यालयचा  एस एस सी परीक्षा मार्च 2020 चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम क्रमांक सागर विलास सजगणे 95.80 द्वितीय क्रमांक कु.सुहानी चंद्रकांत नलवडे 93.60 तृतीय क्रमांक कु. निकिता अरुण केंगार 92.80 तर  विशेष प्राविण्य 51विद्यार्थी,  प्रथम श्रेणी 17, द्वितीय श्रेणी 8 विद्यार्थी आहेत.  

विरकरवाडी ता.माण येथील  न्यू इंग्लिश स्कूल विरकरवाडीचा  एस.एस.सी . परीक्षा २०२०चा निकाल शंभर टक्के  लागला असून विद्यालयात प्रथम क्रमांक  कु. प्रियांका बजरंग कोळपे  91.60 टक्के गुण ,द्वितीय क्रमांक कु.प्राजक्ता विष्णू मदने-90.60 टक्के ,तृतीय क्रमांक कु.धनश्री कृष्णदेव विरकर 89.20 टक्के गुण मिळवले आहेत. विशेष प्राविण्य गुण १७ विद्यार्थ्यांनी तर प्रथम श्रेणी-१७ ,द्वितीय श्रेणी-५ विद्यार्थी आहेत. 

पुळकोटी ता.माण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून यशाचे मानकरी खालील प्रमाणे प्रथम क्रमांक कु.शिंदे अनामिका गुलाब 94.40 टक्के द्वितीय क्रमांक-92.80

कु.झिमल शुभम संजय 92.80 टक्के तर तृतीय क्रमांक- जानकर शुभांगी सिद्धेश्वर 88.60 टक्के गुण मिळवले. 

वळई ता.माण येथील श्री सर्वलिंग विद्यालयचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातील यशाचे खालील प्रमाणे प्रथम क्रमांक कु.काळेल सोनाली बापुसो – 87.60 टक्के, द्वितीय क्रमांक-कु.काळेल वैशाली दत्तात्रय- 86.00 टक्के ,तृतीय क्रमांक- कु.काळेल प्रतीक्षा बापू- 85.60 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले. 

धुळदेव ता.माण येथील श्री. म्हंकाळेश्वर विद्यालयचा  निकाल शंभर टक्के लागला आहे. 

विद्यालयातील 13 विदयार्थ्यांनी डिस्टींक्शन मध्ये प्राविण्य मिळाले.  प्रथम श्रेणीत 9 विद्यार्थी व द्वितीय   श्रेणीत 5 विद्यार्थ्यानी यश संपादन केले.

विद्यालयातील  यश संपादन केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक:- कु.पुतळा प्रकाशकोळेकर 83.20 टक्के, द्वितीय क्रमांक- कु.लतिका रामचंद्र रूपनवर व कु. साधना पंचू ढवळे 83.00 टक्के, तृतीय क्रमांक:-वैभव कैलास कोळेकर व रोहन महावीर शिंगाडे 81.80 टक्के गुण मिळवले आहेत. 

म्हसवड ता.माण येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्यू काॅलेज प्रशाळेचा निकाल 97.46% लागला  असून यशस्वी विद्यार्थी खाली प्रमाणे..

1 अस्मित सूर्यकांत गोरड 95.60 टक्के,2 कु.अंजली सचिन तावरे  92.80 टक्के,3 कु. अमृता किरण शिंदे  92.40टक्के,4 कु.देवयानी राजेंद्र फुले 91.60टक्के,

4 स्वराज्य विक्रम शिंदे  91.60 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले. 

या यशाबद्दल  महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्यू.सोसा.सांगली चेअरमन श्री आर.एस.चोपडे सर, व्हा.चेअरमन श्रीम. एल.टी.शेंडगे मॅडम, जनरल सेक्रेटरी श्री  एस.ए.पाटील सर, खजिनदार श्री एस.व्ही अनुसे, संचालक, जे.ए.माने, एस.एन.विरकर  व संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे  अभिनंदन केले.

“प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश “

महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीच्या माण तालुक्यातील ग्रामीण भागातील विरकरवाडी, धुळदेव, पुळकोटी त्याचबरोबर डोंगरी भागात कार्यरत असलेल्या विरळी व वळई आदी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले असून खर्या अर्थाने या विद्यार्थी व शाळांचे कौतुक सगळीकडे होत आहे. 

ह्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केवळ शाळेत मिळविलेल्या ज्ञानावरतीच सुयश संपादन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या खाजगी शिकवणीची  सोय नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळेतील शिक्षणाच्या जोरावर,शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शाळेने व विद्यार्थ्यांनी मिळविलेले यशच खर्या अर्थाने  माणवासियांसाठी कौतुकास्पद ठरले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!