
दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२५ | बारामती |
अहिल्या मातेचे कर्तृत्व, विचार पुढे नेण्याचे काम ‘अहिल्या भवन’ करेल, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर पाटील यांनी केले.
शेतकरी कुटुंबातील सौ. निर्मला जनार्दन घुले, ढेकळवाडी (बारामती) यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महसूल सहाय्यकपदी त्यांना यश मिळालं. त्याबद्दल आहिल्याभवन हरिकृपानगर, बारामती येथे प्रथमत: सौ. निर्मला घुले यांचा सत्कार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर पाटील यांच्या हस्ते आयोजित केला होता.
यावेळी भगवानराव देवकाते, बबनराव शेळके, अहिल्याभवनचे अध्यक्ष गोविंदराव देवकाते, संयोजक शिवराज जाचक, सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकाते, राजेश कांबळे, भारत रामचंद्रे, जनार्धन घुले, कुलदीप निंबाळकर उपस्थित होते. माणिकराव सोनवलकर पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्वामी समर्थ यांची प्रतिमा भेट देऊन सौ. निर्मला घुले यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे माणिकराव सोनवलकर म्हणाले की, सामाजिक काम करत असताना खेड्यापाड्यातील मुलं-मुली उत्तुंग यश मिळवत आहेत. त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पुढे नेण्याचं काम महसूल सेवेच्या माध्यमातून निर्मला घुले करतील. त्यांनी येथेच न थांबता पुढे यशाचं पाऊल उचलावे आणि त्यांचा सत्कार करण्याचा योग पुन्हा एकदा बारामतीकरांना घडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संयोजक शिवराज जाचक हे स्पर्धा परीक्षेतून यश संपादन करणार्या यशस्वी विद्यार्थ्यांचे घरी जाऊन सत्कार करतात. त्यांच्या या उपक्रमाचे माणिकराव सोनवलकर पाटील यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सुनील देवकाते पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
अहिल्या भवनची निर्मिती सामाजिक कामासाठी मोठ्या ताकदीने, हिमतीने ध्येय पुढे नेण्याची परंपरा जपण्याचे काम केले जाईल, असे गोविंदराव देवकाते यांनी यावेळी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना निर्मला घुले यांनी महसूल सहाय्यक पदावरती न थांबता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे जाण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.