
दैनिक स्थैर्य । 24 जुलै 2025 । सातारा । शेतकर्यांनावार्यावर सोडून रमी खेळणार्या कृषिमंत्र्यांचा निषेध असो, माणिकराव कोकाटे हाय हाय.., अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदवला, तसेच त्यांचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यासोबतच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्त्यांचा डाव खेळत कृषिमंत्री कोकाटे यांचा निषेध नोंदवला, तसेच त्यांच्या निषेधाच्याघोषणा देत महायुती सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.
या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, गोरखनाथ नलावडे, अतुल शिंदे, उमेश देशमुख, विजय राव बोबडे, प्रशांत भोसले, मंगेश ढाणे, मकरंद बोडके, किरण चौधरी, संदीपधुमाळ, तुषार गुरव, गौरव कासट, प्रशांत भोसले, आदित्य चव्हाण, मेघा नलवडे, शुभांगी साबळे, आशा जाधव, उषा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर करावी, तसेच वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटरची सक्ती सुरू केली आहे, त्यास गावागावांतून विरोध होत असल्याने वीज वितरण कंपनीने मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.
अधिवेशनात शेतकर्यांचे प्रश्न महत्त्वाचे असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांना गांभीर्य दिसत नसल्याबद्दल त्यांच्या निषेधाच्या घोषणा या वेळी कार्यकत्यांनी दिल्या, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्त्यांचा डाव खेळत कोकाटेंचा निषेध नोंदवला, तसेच सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.