
स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फलटण दौऱ्यावर आगमन झाले असता, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील विविध योजना आणि विकासकामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील कृषी क्षेत्राच्या विविध प्रश्नांसंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचे समजते.