राज्यातील अतिवृष्टीचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध कृषि विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे वेळेवर होतील यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने काम करुन शेतकऱ्यांना दिलासा देतीलयादृष्टीने काम करण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी कृषि विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकरबी. एस. रासकरमहाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक श्री. भागडेराज्याच्या चारही कृषि विद्यापीठांचे कुलसचिव उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी विभागनिहाय माहिती घेतली. मोसमी पाऊस परतीच्या मार्गावर असताना राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. विशेषत: काही भागात सोयाबीनकांदा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याठिकाणी तत्काळ पंचनामे शासकीय यंत्रणेच्यावतीने करावेत. सर्व पंचनामे वेळेवर करुन राज्यात किती नुकसान झालेयाची वस्तुनिष्ठ माहिती घेण्याची सूचना त्यांनी केली.

सिल्लोड येथे कृषि भवन आणि मका संशोधन केंद्र उभारणीच्या सूचना

राज्यातील कृषि आयुक्तालयातील तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठराहुरीडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोलाबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठदापोलीवसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठपरभणी यांच्या कार्यक्षेत्रातील विविध इमारतींच्या बांधकामाचा आढावा मंत्री श्री. सत्तार यांनी घेतला. औरंगाबाद शहरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मालकीची जमीन आहे. याठिकाणी कृषि विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करता येईल कात्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली.

सिल्लोड येथे कृषि भवन उभारणी तसेच मका संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!