दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय दापोलीच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभवाअंतर्गत विधवली येथे कृषिदिन साजरा केला.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी सर, महादेव बक्कम, अध्यक्ष विधवली विभाग संस्था, पांडुरंग उभारे मुख्याध्यापक विधवली हायस्कूल यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.
याप्रसंगी डॉ. राजेश मांजरेकर सर, डॉ. सुधाकर पाध्ये सर, कु. अनिकेत काजरेकर, कु. रितेश बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आरसीएफ थल अलिबाग चे अधिकारी रवी नायक यांनी नॅनो युरियाबद्दल मार्गदर्शन केले.
त्यानंतर कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. विधवली शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर, कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मनोज तलाठी, ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाधिकारी जीवन आरेकर उपस्थित होते. वरील कार्यक्रमाचे आयोजन सौरभ शेडगे, सुमेध वाकळे, अनिश जगताप, जीवन गोडसे, आकाश जाधव, अनिकेत काजरेकर, लक्ष्मण माळगी, वैभव फुलसुंदर, पार्थ गुरसळे, प्रतीक चव्हाण, रिषभ मोरे यांनी केले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सचिन कार्ले यांनी केले तर आभार जीवन आरेकर सर यांनी मानले.