
दैनिक स्थैर्य । 3 जुलै 2025 । फलटण । जिंती, ता. फलटण येथे कृषी कन्यांच्या पुढाकाराने कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वैभव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, कृषी सहाय्यक अधिकारी नितीन शिंदे, प्रा. दादासाहेब कुलाळ, प्रा. नितिशा पंडित, प्रा. निलिमा धालपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. डॉ. गायकवाड यांनी नवीन कृषी तंत्रज्ञान, उत्पादन वाढ व मातीची सुपीकता वाढ यावर मार्गदर्शन केले. नितीन शिंदे यांनी सोयाबीन उत्पादन वाढ याबाबत मार्गदर्शन केले.
कृषिकन्यांनी सांगितले की, कृषी दिन हा फक्त साजरा करण्याचा दिवस नसून शेती क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देण्याचा दिवस आहे. युवकांनीही शेतीकडे वळावे. तसेच शेतीत आधुनिक प्रयोग करून शेतीला चालना द्यावी.कार्यक्रमात शेतीशी संबंधित स्पर्धा, शेतकरी चर्चासत्र, तसेच सेंद्रिय खत या बद्दल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी.निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित यांनी मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषिकन्या वैष्णवी पुणेकर, वैष्णवी देवकर, वैष्णवी कारखेले, प्रीती मांजरे, कल्याणी कुटे, श्वेता निकम, मुस्कान शेख यांनी केले.