जिल्ह्यातील शितगृह उद्योगांना कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२३ । सातारा । राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील शितगृह उद्योगांना भेटी देऊन या  उद्योगांमध्ये शेतकऱ्यांना जोडण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कृषि आयुक्त श्री चव्हाण यांनी सातारा एमआयडीसीतील भंडारी ॲग्रो इंडस्ट्रिज, खंडाळा येथील ज्योती कदम यांच्या शितगृहास भेट दिली. भेटी वेळी त्यांनी शितगृह व्यवसायाबद्दल  आणि साठवणूक करण्यात आलेल्या शेतमालाविषयी जाणून घेतले. तसेच मेगा फूड पार्क, सातारा येथेही त्यांनी भेट दिली व मेगा फूड पार्कचे व्हाईस प्रोसिडेंट विजयकुमार चोले यांच्याशी चर्चा केली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्याबाबत, शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग करण्याबाबत मार्गदर्शन केले.

कृषि आयुक्त श्री. चव्हाण यावेळी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, सातारा येथे ईट राईट मिलेट मेला या कार्यक्रमासही उपस्थिती लावली व उपस्थितांना मानवी आहारात भरडधान्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, कृषि विकास अधिकारी विजय माईनकर, विभागीय कृषि अधिकारी बापूसाहेब शेळके, साताराचे तालुका कृषि अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, खंडाळाचे तालुका कृषि अधिकारी गजानन ननावरे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!