जिल्ह्यात खतांचा तुडवडा भासू देणार नाही – कृषी सभापती मंगेशदादा धुमाळ
स्थैर्य, वाठार स्टेशन, दि. २० (मुकुंदराज काकडे) : सातारा जिल्ह्याचे कृषी सभापती मंगेशदादा धुमाळ यांनी कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वाठार स्टेशन येथील खतांच्या दुकानांना अचानकपणे भेट दिली व जाणून घेतल्या शेतकरी व खत विक्रेत्यांच्या समस्या व जिल्ह्यात खतांचा तुडवडा पडू देणार नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन येथे ६० ते ७० गावांचा समावेश होतो येथे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर खते, बी- बियाणे व शेती विषयक सर्व प्रकारच्या गरजा वाठार स्टेशन येथे भागविण्यासाठी नित्याने येत असतो. आत्ता खतांचा तुटवडा भासल्याच्या काही तक्रारी कृषी सभापती मंगेशदादा धुमाळ यांच्याकडे गेल्याने लगेच कृषी सभापती यांनी वाठार स्टेशन येथील खतांच्या सर्व दुकानांना, खरेदी-विक्री संघाला अचानकपणे भेट दिल्याने चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी मोहीम अधिकारी महांगडे, तालुका कृषी अधिकारी बावधनकर मॅडम उपस्थित होत्या. कृषी सभापती मंगेशदादा धुमाळ यांनी यावेळी शेतकरी यांच्याशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या.
कृषी सभापती मंगेशदादा धुमाळ म्हणाले की, सर्व खते विक्रेत्यांनी पॉज मशीनचा वापर करावा म्हणजे खत कंपन्या दुकानदार यांना तुडवडा प्रमाणे खत उपलब्ध करून देतील व पुढे हेही म्हणाले की सातारा जिल्ह्याला खतांचा तुडवडा पडू दिला जाणार नाही.
पहिल्यांदाच अशा प्रकारे कृषी सभापती हे तळागळापर्यंत जावून शेतकऱ्यांच्या हितासाठी या आपत्तीच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांसोबत ग्राउंड रिपोर्ट घेताना दिसून येत आहेत याबद्दल शेतकरी वर्गात तत्पर कृषी सभापती मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.