दैनिक स्थैर्य | दि. ०४ जानेवारी २०२५ | फलटण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पाडेगावमध्ये एक अनोखी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि शेती विषयक चित्रे रेखाटली.
या चित्रकला स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस सी निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, प्रा. गोपीचंद धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत इंगोले धनंजय, केसकर राहुल, काटकर सौरभ, कांबळे रोहन, गोडसे आदित्य, धुमाळ श्रीजीत, रनवरे शिवतेज यांनी ही स्पर्धा योग्य पद्धतीने पार पाडली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी शेती विषयक चित्रे रेखाटली, ज्यामध्ये त्यांची कल्पनाशक्ती आणि रचनात्मक क्षमता दिसून आली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक प्रतिभेची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन उत्साह आणि प्रेरणा निर्माण केली आहे. कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी असे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करण्याची योजना आहे, ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन मिळेल.