कृषी संशोधक डॉ. सुनील कराड यांचे ५ आणि ६ एप्रिलला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कृषी संशोधन क्षेत्रात योगदान देणारे डॉ. सुनील कराड यांनी केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. ५ आणि गुरुवार दि. ६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.

अन्न सुरक्षेचे आहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘मिलेट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी संशोधक डॉ. कराड यांनी मिलेटविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!