दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत निसर्गमित्र गटाने माणगाव तालुक्यातील कोशिंबळे या गावात पेरणीपूर्व बीज प्रक्रिया कशी करायची याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यासाठी व शेतकर्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या उपक्रमांतर्गत बियाणे निवड उगवण चाचणी यांचे महत्त्व सांगण्याबरोबरच प्रत्यक्षात मिठाच्या द्रावणाचा वापर (१५% ) करून त्यामध्ये भाताचे बियाणे टाकून दाखवले व जे बियाणे पाण्याच्या तळाला आहेत ते भात लागवडीसाठी स्वच्छ धुऊन वाळवून वापरावे व जे बियाणे पाण्यावर तरंगत असतील ते बियाणे काढावे, उगवण चाचणीबद्दलही सविस्तर अशी माहिती देण्यात आली. या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी व माहिती घेण्यासाठी अनेक महिला शेतकर्यांनी हजेरी लावली होती.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन जीवन गोडसे, आकाश जाधव, अनिश जगताप, अनिकेत कांजरेकर, रीषभ मोरे, लक्ष्मण माळगे, सुमेध वाकडे, सौरभ शेडगे, वैभव फुलसुंदर, पार्थ गुरसाळे यांनी केले. यांना कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहाचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी सर व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जीवन आरेकर, विषयतज्ज्ञ डॉ. उदय पेठे यांनी मार्गदर्शन केले.