रावडी बु. येथे ‘फळ बागेसाठी खतांचा वापर’ यावर कृषिदूतांचे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 30 नोव्हेंबर 2024 । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024 – 25 कार्यक्रमाअंतर्गत रावडी बु. येथे फळ बागेसाठी आवश्यक असणारे खते व त्याचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दिले.

गावचे ग्रामस्थ अक्षय अनिल संकपाळ यांच्या केळी फळ बागेत हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिका साठी ’रिंग पद्धत’ वापरण्यात आली. साधारणतः फळ झाडापासून 1 फुट अंतरावर वर्तुळ आकारात 8 सेमी उंची चे कुदळ च्या मदतीने खोदकाम करण्यात आले, पिकामध्ये आवश्यक घटकांची कमी असल्यांमुळे, पानांचा रंग पिवळा होणे, अपेक्षित असलेले वाढ न होणे, अश्या अनेक समस्या होत्या, त्या लक्षात घेता कृषीदुतांनी पिकासाठी आवश्यक असणारे एन:पी:के या खतांचा वापर केला. प्रति झाडास 120 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम एसएसपी व 120 ग्रॅम एमओपी अश्या खतांचा वापर करण्यात आला. यावेळी गावचे शेतकरी राहुल संकपाळ, दादासो निकम, हनुमंत गायकवाड, विकास जगदाळे, विकास शिंदे, सुहास भोसले, विजयकुमार बोंद्रे, इ. शेतकरी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित, समन्वयक प्रा. निलिमा धालपे व प्रा.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत प्रजोत जगताप, रोहन कदम, अनिकेत गौंड, प्रणव गरगडे, तुषार गोलांडे, ओमकार गुरव, सार्थक शेंडगे यांनी प्रात्यक्षिक पार पाडले.


Back to top button
Don`t copy text!