दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमाअंतर्गत मुरुम, ता. फलटण, जि. सातारा येथे गाईंच्या गोठ्याची स्वच्छता कशी करावी व निगा कशी राखावी, त्याचे प्रात्यक्षिक मुरुम गावातील शेतकरी निमित शिंदे (झेंडे) यांच्या सागर फार्म येथे मुक्त गाईच्या गोठ्यात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. गोठ्यातील सर्व घाण काढून गोठा स्वच्छ करण्यात आला. गोठ्यातील सर्व साहित्य, मशिनरी स्वच्छ करण्यात आली. तसेच गोठ्यातील जनावरे कशी धुवावीत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
गोठ्याची अस्वच्छता ठेवल्यामुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली. त्यामुळे दुधाची गुणवत्ता कमी होते हे सांगितले. यावेळी गावातील काही शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नीतिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम व प्रो. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत भोंग अनिल, राठोड आराज, भोंग राहुल, भोसले विश्वजित, पटेल खलील, कुंभार अनिकेत, भोसले सिद्धांत, गाढवे तेजस यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.