स्थैर्य, सोलापूर, दि. 30 : कोरोना बाधा झाल्याची शंका असल्याच्या नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुणे येथिल क्रस्ना डायग्नोस्टिक संस्थेसोबत सांमजस्य् करार केला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.प्रदीप ढेले यांनी दिली.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रा. लि. पुणे महानगरपालिका अंतर्गातील कै. जयाबाई नानासाहेब सुतार रुग्णालय पुणे यांना भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषत दिल्ली (आय.सी.एम.आर.) या संस्थेकडून कोविड-१९ चाचणी करण्याची परवानगी दिलेली आहे. सदर तपासणी आर. टी.- पी.सी.आर अत्यंत अद्ययावत पद्धतीने करण्यात येते. क्रस्ना डायग्नॉस्टिक्स संस्था रेडिओलॉजि आणि पॅथॉलॉजिमध्ये मागील दहा वर्षांपासून भारतातील १५ राज्यांमध्ये 1800 पेक्षा जास्त केंद्रांवरती सार्वजनिक भागीदारी तत्वावर यशस्वीरीत्या आरोग्य सेवा देण्याचं काम करत आहे. भारतातील सर्वात प्रथम मुंबई व त्यापाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे कोविड-१९ फिरती अद्ययावत चाचणी बस याच संस्थेमार्फत सुरु करण्यात आली आहे.
एक जून २०२० पासून सोलापूर शहरातील नागरिकांचे कोविड-१९ स्वॅब संकलन (घशातील स्त्रावाचे नमुने) करुन चाचणी प्रक्रिया संस्थेमार्फत कै. जयाबाई नानासाहेब सुतार रुग्णालय पुणे, येथे तपासनीस पाठवले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी समन्वयक दत्तात्रय वारे (७४२००१४१२२) यांच्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर सोलापुरात मेट्रोपोलीस लॅब मध्ये ही स्वॅब संकलन आणि तपासणीस मंजुरी मिळाली आहे. त्या संदर्भात डॉ. रमीज 7741918857 यांच्याशी संपर्क साधावा.