दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । सातारा । सातारा महसूल विभागातील वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी किती लावून आंदोलन केले. या विभागातील महसूल सहाय्यक पदे तातडीने भरण्यात सह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील साडेतीनशे कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. जर शासनाने त्यांच्या मागण्यांचा विचार केला तर चार एप्रिल पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सातारा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, जिल्ह्यातील महसूल कर्मचारी प्रचंड कामाच्या ताणामध्ये आहेत. प्रत्येक महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे संलग्न पदभार असून असून महसूल सहाय्यक पदाचा राज्य शासनाला सादर करण्यात आलेला प्रस्ताव जवळपास दीड वर्ष पेंडिंग आहे. याशिवाय अव्वल कारकून व मंडल अधिकारी ही जिल्हास्तरीय पदे असताना त्यांच्या या राज्य शासन पातळीवर एकत्रित याद्या करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. हा निर्णय अन्यायकारक असून राज्य संवर्गाच्या यांच्या याद्या स्वतंत्र ठेवण्यात याव्यात अशी संघटनेची मागणी आहे. याशिवाय मंडलाधिकारी यांमधून पदोन्नतीवर असणारे नायब तहसीलदार ही पदे घोषित असताना त्यांचे अध्यादेश अद्यापही प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत.
या सर्व मागण्यांसाठी जिल्ह्यात महसूल विभागाच्या सातार्यातील मुख्य शाखेचे सह इतर सज्ज आणि तलाठी कार्यालयातील अशा सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांनी आज काळात किती लावून आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर कारंडे यांनी सांगितले. शासनाने आमच्या मागण्यांचा तातडीने विचार करावा अन्यथा 4 एप्रिलपासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार असल्याचे कारंडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.