स्थैर्य, कराड, दि. 9 : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने आगाशिव डोंगर परिसर हिरवागार करण्यासाठी कंबर कसली आहे. कृष्णा विद्यापीठाच्या वनसंवर्धन प्रकल्पांतर्गत आगाशिव डोंगरावर 5000 रोपट्यांचे वनीकरण आणि संगोपन करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले व सौ. सुवर्णा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानास प्रारंभ करण्यात आला.
कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा वनविभाग आणि कोरेगाव येथील संकल्प सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराअंतर्गत कृष्णा विद्यापीठाने जखिणवाडीच्या हद्दीतील आगाशिव डोंगरावरील 8 हेक्टर जमीन दत्तक घेतली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा विद्यापीठातर्फे 5000 रोपट्यांची लागवड करून संगोपन केले जाणार आहे. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पिंपळाचे रोप लावून या वनसंवर्धन अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन, मास्कचा वापर व अन्य नियमांची अंमलबजावणी करत पार पडलेल्या या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर, अतिरिक्त संशोधन संचालक संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, सातारा जिल्ह्याचे सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे, कराडचे वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल ए. पी. सवाखंडे, वनसंरक्षक रमेश जाधवर, कृष्णा वैद्यकीय दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. एस. सी. काळे, कृष्णा फार्मसी महाविद्यालयाचे एन. डी. चिवटे, डॉ. अरुण पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण यांच्यासह अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते.